सत्ता गेली तर मी झोळी उचलून निघायला तयार आहे – मोदी

लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात असताना गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘देशात पुन्हा भाजपचीच सत्ता येईल’ असा विश्वास दर्शवला आहे. 23 मे नंतर नरेंद्र मोदींचे पॅकअप होणार, असे विरोधक म्हणतात. आणि जर खरंच अशी वेळ तुमच्या आली तर तुम्ही काय कराल? असा सवाल मोदींना करण्यात आला होता. खरच जर अशीच वेळ आली तर, मी माझी झोळी उचलून कधीही निघायला तयार असेन असे देखील ते यावेळी म्हणाले.

मी तुम्हाला खात्री देतो की, जनतेने भाजपच्या हातात पुन्हा सत्ता द्यायचे ठरवले आहे. एवढेच नव्हेतर 2014 च्या तुलनेत या वेळेस भाजपच्या जागांची संख्या वाढेल, असे देखील मोदींनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Loading...
महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.