‘मी असतो तर कानाखाली चढवली असती’, मुख्यमंत्र्यांवर बोलताना राणेंची जीभ घसरली

मुंबई : गेलय काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने मंत्रिमंडळ विस्तार केला. यानंतर या मंत्रिमंडळात भाजपाचे जेष्ठ नेते नारायण राणे यांना सामील करून घेण्यात आले. तसेच आता नवनिर्वाचित मंत्र्यांची महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रा सुरु झालीय. मुंबईत ‘जन आर्शीवाद यात्रे’च्या प्रारंभी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केले. नारायण राणे निघून गेल्यावर शिवसैनिकांनी स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले. यावरून राज्यातील राजकारण तापले होत.

राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रेचा कालचा पाचवा दिवस आहे. नारायण राणे सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. त्यानंतर आता महाड इथे पत्रकार परिषदेत काल टीका करत असताना त्यांची जीभ घसरली आणि मुख्यमंत्र्यांना कानाखाली मारण्याची भाषा नारायण राणेंनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वातंत्र दिनावरील भाषणावर टीका करताना राणेंचा तोल ढळला. मात्र राणेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वातंत्र्यदिनी भाषण देताना काहीसे गडबडले होते. त्यावरून नारायण राणे यांनी बोलताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ‘बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून, अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती’, असं वादग्रस्त वक्तव्य केलं नारायण राणे यांनी केलं आहे.

तसेच राणे पुढे म्हणाले कि, देशाच्या स्वातंत्र्य दिनाविषयी तुम्हाला माहिती नसावी? मला सांगा किती चीड येणारी गोष्ट आहे, असंही राणे म्हणाले. सरकार कोण चालवतय ते कळत नाही, सरकारला ड्रायव्हरच नाही, अशी टीका देखील त्यांनी केलीय. तर राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर देखील निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा