‘भान राखून वक्तव्य केलं असतं तर…’; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राणेंना टोला

मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष काही कमी होताना दिसत नाहीये. एकीकडे राज्यात शिवसेना आणि राणे वाद चांगलाच पेटला आहे. या वादात भाजपही राणेंच्या समर्थनार्थ उतरली. मात्र अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचं वृत्त आहे. या भेटीतील तपशील गुलदस्तात असला तरी या भेटीमुळे तर्कवितर्कांना एकच उधाण आलं आहे.

यानंतर आता आणखीन एक वक्तव्य समोर आलं आहे. राणे-सेना वादावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिलीय. केंद्रीय मंत्री भाजप नेते नारायण राणे यांच्या खात्यातून महाराष्ट्रासाठी किती निधी मिळणार?, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करण्यात आला. यावर बोलताना अजित पवारांनी नारायण राणेंना टोला हाणला आहे.

या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले कि, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात चौघांना स्थान दिलं आणि त्यानंतर त्यांना सांगितंल फिरा त्यामुळे त्यांना आता फिरणं भाग आहे. मात्र बोलताना जर प्रत्येकाने भान राखून वक्तव्य केलं तर असे प्रसंग घडणार नाहीत, असं अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा