रवी शास्त्री यांनाच या पदावर कायम ठेवले तर मला आनंदच- कोहली

भारतीय संघाचा मुख्य आणि इतर सपोर्ट स्टाफ यांच्यासाठी सध्या बीसीसीआय  ने अर्ज मागवले आहेत. या पदासाठी पात्रतेचे निकष ठरवून देण्यात आल्यानंतर अनेक इच्छुक माजी क्रिकेटपटूंनी या पदासाठी अर्ज केले असल्याची चर्चा आहे. या दरम्यान कर्णधार याने मात्र प्रशिक्षकपदी कोणाला पसंती असावी याबाबत स्पष्ट केले आहे.क्रिकेट सल्लागार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अद्याप मला या संदर्भात काहीही विचारलेले नाही.

जर त्यांना माझे मत हवे असेल तर मी त्यांना नक्कीच मदत करेन. मी स्वतः जाऊन त्यांच्याशी संवाद साधेन. यांच्याबाबत जर बोलायचे झाले तर आमच्या संघाचा आणि त्यांचा चांगला मेळ जुळला आहे. त्यामुळे त्यांनाच या पदावर कायम ठेवण्यात आले तर मला आनंदच आहे. पण प्रशिक्षक निवडणाऱ्या समितीने अद्याप माझ्याशी संपर्क साधलेला नाही”, अशी कोहलीने स्पष्ट केले.भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना झाला. त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने रोहित शर्मा बरोबर मतभेद असल्याचे वृत्तही फेटाळून लावले.

महत्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.