‘मी गप्प बसले तर लोकांना…’;राज कुंद्रा प्रकरणात नाव आलेल्या अभिनेत्री फ्लोराने सोडले मौन

मुंबई : काही दिवसांपूर्वी राज कुंद्रा प्रकरणाशी अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ चित्रपटात झळकलेली अभिनेत्री फ्लोरा सैनीचे ही नाव जोडले जात होते. आता या प्रकरणात फ्लोरा सैनीने आपले मौन सोडले आहे.

शनिवारी एका वृत्तवाहिनीने काही व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे दावा केला होता की, फ्लोरा राज कुंद्राच्या संपर्कात आहे. या मेसेजेसच्या आधारे, असा दावा केला गेला होता की उमेश कामत आणि राज कुंद्रा त्यांच्या नवीन अ‍ॅप बॉलिफेमच्या एका गाण्यासाठी फ्लोराला साईन करण्याविषयी बोलत आहेत.

न्यूज पोर्टलच्या या दाव्यांनंतर फ्लोराने तत्काळ तिचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला, ज्यामध्ये तिने या वृत्तांचा खंडन करत म्हटले आहे की, अभिनेत्रीला कास्ट करण्याविषयी उमेश कामत आणि राज कुंद्रा यांच्या चॅटमध्ये तिचा काही संबंध नाही आणि याबद्दल तिला काहीच कल्पना नाही.

त्याचवेळी एका वृत्तानुसार फ्लोरा सैनी म्हणाली की, ‘मी राज कुंद्राशी कधीही बोलले नाही. म्हणूनच मी माझं म्हणण मांडत आहे. मी गप्प बसले तर लोकांना वाटेल की, माझ्याकडे काहीतरी लपवण्यासारखे आहे. गप्पांमध्ये इतर नावांचा उल्लेखही केला गेला होता, बहुदा बोल्ड सीन करणार्‍या अभिनेत्री. मी फिल्मी कुटुंबातील नसल्यामुळे माझे नाव मला विचारल्याशिवाय या प्रकरणात ओढणे योग्य नाही.”

फ्लोरा पुढे म्हणाली की, ”मी फक्त एक वेब सीरिज केली आहे, ज्याचे नाव गंदी बात आहे आणि त्यामध्ये बोल्ड दृश्ये होती. ‘तथापि’, ‘स्त्री’, ‘लक्ष्मी’ आणि ‘बेगम जान’ या चित्रपटांमधील माझे काम लोक विसरले आहेत. म्हणूनच माझे नाव या विवादात ओढले जात आहे, परंतु यामुळे माझी प्रतिमा खराब होऊ शकत नाही”

तसेच फ्लोराने सांगितले की, तिला राजच्या हॉटशॉट्सची ऑफर मिळाली होती. तिला सांगण्यात आले होते की, एक वेब सीरीज तयार केली जात आहे, ज्यासाठी तिने साफ नकार दिला होता.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा