करीनाला सीतेची भूमिका दिली तर परिणाम वाईट होतील; बजरंग दल आक्रमक

मुंबई : बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री करिना कपूर येणाऱ्या रामायण आगामी चित्रपटात सीतेची भूमिका करणार अशी बातमी सगळीकडे पसरली आहे. त्यावरुन अनेकांनी करिनाला ट्रोल करण्यास सुरुवात केलीय. यात आता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी करिनाच्या विरोधात तक्रार करून करीनाला जर सीतेची भूमिका दिली तर वाईट काही घडेल, अशी धमकी दिली आहे.

नागपूरमधील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी करिनाच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. दलाच्या कार्यकर्त्यांनी जे निवेदन दिले आहे, त्यात करिनाला स्पष्ट शब्दांत सांगण्यात आले आहे. जर हा चित्रपट तयार झाला तर त्याला विरोध करण्यात येईल.

यापूर्वी तांडव ही मालिका आली होती. त्यात हिंदू देवतांवर टीका करण्यात आली होती. त्यात करिना कपूरचा पती सैफ अली खान होता. आता सीता नावाचा चित्रपट येतो आहे. त्यात करिना प्रमुख भूमिकेत आहे. यामुळे हिंदू समाजाच्या भावना का दुखावतात, असे बजरंग दलाकडून सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा