शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कायदे आणलेत म्हणता, मग ते मागे घेतल्याने कुणाचं नुकसान होणार आहे?

नवी दिल्ली : गेल्या एक महिन्यापासून केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. हे शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या मांडला आहे. यानंतर आता राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटक यासारख्या राज्यातून शेतकरी आलेले आहेत. हे तीन कायदे मागे घेतल्याशिवाय येथून हटणार नाहीत, असं शेतकऱ्यांनी म्हटलंय.
नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणण्यात आले आहेत, असं सरकार सांगत आहे. मात्र कायदे मागे घेतल्याने कुणाचे नुकसान होणार आहे हे सरकारने स्पष्ट करावं, असं आंदोलक शेतकऱ्यांचं मत आहे. तसेच केंद्र सरकार जोवर कृषी कायदे रद्द करुन आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत नववर्षाचं सेलिब्रेशन करणार नाही, असा पवित्रा दिल्लीच्या सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतला आहे.
येथून जिंकूनच परत जाणार आहोत. अन्यथा, येथेच बसून राहणार आहोत. फुटणार नाहीत, तुटणार नाहीत, असं शेतकऱ्यांनी म्हटलंय. ही लढाई आता केवळ शेतकऱ्यांची राहिलेली नाही. ही लढाई आता श्रीमंत आणि गरीब यांच्यातील आहे, असं मुरादाबादचे शेतकरी धर्म पाल यांनी म्हटलंय.
महत्वाच्या
- सोनिया गांधींचे नामांतर तुम्हाला चालते पण औरंगाबाद चे संभाजीनगर का नाही ? भाजपचा सवाल
- आता बघू, बाळासाहेबांचा शब्द महत्त्वाचा की सत्तेची लाचारी! राणेंचा मुखमंत्र्यांवर निशाणा
- मोठी बातमी ; शिवसेनेच्या या दिगग्ज नेत्याचं राज ठाकरेंच्या उपस्थित मनसेत प्रवेश