InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पॅटर्नलॉकमुळे मोबाईल लॉक झाला तर…… ?

प्रत्येकजण आपल्या फोनमध्ये काही महत्वाच्या गोष्टी ठेवतात. त्यामुळे सुरक्षेसाठी आपल्या फोनला पॅटर्नलॉक ठेवला जातो.  पण जर हा पॅटर्नलॉक आपण स्व:ताच विसरलो तर काय होईल याचा विचारही आपण करु शकत नाही.

आता या गोष्टीची काळजी करण्याची काही गरज नाही कारण जर तुम्ही तुमच्या फोनचा पॅटर्नलॉक विसरलात तर या सोप्या पद्धतीने तुम्हाला हा लॉक पुन्हा खोलता येईल. अँड्रॉईड डिव्हाईस लॉक झाल्यास त्याला अँड्रॉईड डिव्हाईस मॅनेजरद्वारे खोलता येऊ शकते. यामुळे तुमचा मोबाईलवरील जीमेल आयडी आणि पासवर्ड लक्षात असल्यास त्याद्वारे अनलॉक करता येते.

असे करावे अँड्रॉईड डिव्हाईस अनलॉक ?

  • यासाठी कॉम्प्युटरवर जीमेल लॉग इन करून अँड्रॉईड डिव्हाईस मॅनेजरवर जाऊन तुम्ही सध्या वापरत असलेले डिव्हाईस शोधावे. या डिव्हाईसच्या टॅबवर जाऊन अनलॉक करावे. मात्र, यासाठी फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन सुरु असणं गरजेचं असतं. या मॅनेजरवर तुम्ही कोणत्यावेळी कुठे होता याबाबतचीही माहिती मिळते.
  • डिव्हाईसचे पॅटर्नलॉक विसरायल्यास आणखी काही उपाय आहेत. तुम्हाला फरगॉट पॅटर्नवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला जीमेल खात्याची माहिती द्यावी लागेल.
  • वरील दोन्ही पर्यायांनी लॉक निघत नसल्यास शेवटचा पर्याय म्हणजे फॅक्टरी रिसेट. पण या पर्यायामुळे फोनमधील सर्व माहिती डिलीट होईल.
  • मात्र मेमरीकार्ड मधील माहिती तशीच राहते. यासाठी फोन स्वीच ऑफ करून ऑन करताना अप व्हॉल्यूम बटन, होम बटन आणि पावर बटन एकाचवेळी काही सेकंदांसाठी दाबून ठेवावे. यानंतर स्क्रीनवर काही पर्याय दिसतील. यामध्ये फॅक्टरी रिसेटचा पर्याय सिलेक्ट करा.

महत्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply