मुश्रीफांचे आरोप खरे असतील तर माझ्यावर कारवाई होईल, मी घाबरत नाही : चंद्रकांत पाटील

मुंबई : भाजपचे फायर ब्रँड नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा ठाकरे सरकारला अडचणीत आणणारा दावा केला आहे. अनिल देशमुख, अनिल परब यांच्यानंतर आता सोमय्यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप लावले आहेत. मुश्रीफ यांनी केलेल्या १२७ घोटाळ्यांचे तब्बल २७०० पानी पुरावेच आपण आयकर विभागाकडे सादर केल्याचं किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं.

यानंतर सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर हसन मुश्रीफ यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली. यावेळी हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरच भ्रष्टाचारचे आरोप केले आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले कि,चंद्रकांत पाटील यांच्यावरही हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार असल्याचं मुश्रीफ म्हणालेत.

यानंतर या सगळ्या पार्श्वभूमीवर आता चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. ‘याबाबत बोलताना ते म्हणाले कि, ‘हसन मुश्रीफांना माझं नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही. माझं नाव घेऊन त्यांना झोप लागत असेल तर बरं आहे. माझ्यावर खुशाल तक्रार करा, कुठेही करा. मी कशाला घाबरत नाही. हॅब्रीड अॅनोविटी मध्ये ३० हजार कोटीची कामं निघाली.

सरकारकडे पैसे नसल्यामुळे दोन वर्ष ६० टक्के आणि ४० टक्के अशी ती कामं होती, त्याचं टेंडर निघालं आणि आता काम पूर्ण होत आहेत. हॅब्रीड अॅनोविटीमध्ये जी कामं झाली ती नॅशनल लेव्हलची झाले आहेत. ती मग तुमच्या सरकारने थांबवायला हवी होती, का थांबवली नाहीत? मुश्रीफांच्या आरोपांमध्ये बूड असेल तर माझ्यावर कारवाई होईल, मी काय घाबरत नाही.’ असे रोखठोक मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा