“देशात १०० कोटी नाही तर, केवळ 23 कोटी लसी दिल्या गेल्या, पुराव्यानिशी सिद्ध करू”: संजय राऊत

मुंबई : देशात कोरोनाविरोधातील लसीकरणाच्या मोहिमेत नुकताच लसीचे 100 कोटी डोस देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार करण्यात आले असल्याचे केंद्राकडून सांगितले जात आहे. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.

“देशात 100 कोटी लसीकरण झाले हा दावा खोटा आहे. केवळ 23 कोटी लसी दिल्या गेल्या आहेत, ही बाब आम्ही पुराव्यानिशी सिद्ध करू,” असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

“लडाखमध्ये चिनी सैन्य सीमा पार करून भारताच्या हद्दीत घुसले आहे. तर काश्मीरमध्ये हत्याकांड होत आहेत आणि आपल्याकडे लसीचे उत्सव साजरे केले जातात. देशातील वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर यावर कुणी काही बोलत नाही,” असं संजय राऊत म्हणाले.

तसेच, “याआधी 100 कोटी डोस खरोखर पूर्ण झाले आहेत का? जगामध्ये आपला देश लसीकरणात 19 व्या स्थानावर आहे. या संदर्भात वेगवेगळे आकडे बाहेर येत असतात,” असं राऊत म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा