रोहित नाही तर ‘या’ खेळाडूला कॅप्टन करा, गावसकरांचा सल्ला

मुंबई : टी ट्वेण्टी वर्ल्ड कप तोंडावर असताना टीम इंडियात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. कारण कर्णधार विराट कोहली टी ट्वेण्टीच्या कर्णधारपदावरुन पायउतार होणार आहे. विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून याबाबतची घोषणा केली. विराट कोहली केवळ टी ट्वेण्टीची कॅप्टन्सी सोडणार आहे. तो वन डे आणि कसोटी फॉरमॅटमध्ये कर्णधारपदी कायम असेल.

यावेळी त्याने कामाचा ताण समजून घेणं ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि गेल्या 8-9 वर्षांत प्रचंड कामाचा ताण सर्व 3 फॉर्मेट खेळत आहे आणि गेली 5-6 वर्षे नियमितपणे कर्णधारपदाची कामगिरी पार पाडली, आता मला वाटते की मला स्वतःला जागा देण्याची गरज आहे, असं विराट कोहलीने म्हटलं आहे.विराटनंतर टीम इंडियाचं नेतृत्व उपकर्णधार म्हणून कार्यरत असलेल्या रोहित शर्माकडे येणार असल्याची चर्चा आहे.

यानंतर या सगळ्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर यांनीही यावर भाष्य केलं आहे. तसेच विराटच्या नंतर कोणाला कॅप्टन केलं पाहिजे याबाबत देखील त्यांनी निवड करण्याचा सल्ला निवड समितीला दिला आहे. गावसकरांनी बीसीसीआय भविष्याचा विचार करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. असं म्हणत त्यांनी आपल्या आवडत्या खेळाडूच नाव घेतलं आहे.

भारत नव्या कॅप्टनला तयार करण्याचा विचार करत असेल तर त्यासाठी केएल राहुलचा विचार होऊ शकतो. त्यानं चांगली कामगिरी केली आहे. तसेच इंग्लंडमध्येही त्यानं चांगली बॅटींग केली आहे. तो आयपीएल, वन-डे क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करत आहे, त्याला कॅप्टन केले जाऊ शकते.’राहुल आयपीएलमध्ये पंजाब किंग्स टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टनसीचा प्रभाव त्याच्या बॅटींगवर पडलेला नाही, असंही गावसकरांनी यावेळी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा