हिंमत असेल तर ३७० पुन्हा आणून दाखवा – नरेंद्र मोदी

विरोधकांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी काश्मीरमध्ये पुन्हा लागू करू दाखवावे, असे आव्हान पंतप्रधान यांनी दिले. ते रविवारी येथील भाजपच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी मोदींनी महाराष्ट्रातील जनतेला साद घालण्यासाठी पुन्हा एकदा चा राग आळवला. त्यांनी म्हटले की, ५ ऑगस्टला भाजपने ऐतिहासिक असा निर्णय घेऊन दाखवला. त्यापूर्वी काश्मीरमधील रद्द करणे, ही अशक्यप्राय गोष्ट वाटायची. मात्र, भाजपने ते धाडस दाखवले. परंतु, ही गोष्ट विरोधकांना रुचलेली नाही.

हे लोक पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. ३७० सारख्या राष्ट्रहिताच्या निर्णयावरून विरोधक राजकारण करत आहेत. अनुच्छेद ३७० रद्द झाल्याचा इतकाच त्रास होत असेल तर विरोधकांनी यंदाच्या निवडणुकीत तशी स्पष्ट भूमिका घ्यावी. मी तुम्हाला आव्हान देतो की, तुम्ही निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० पुन्हा आणू, असे आश्वासन द्यावे. अन्यथा मगरीचे अश्रू ढाळणे बंद करावे, असे मोदींनी म्हटले.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.