“रस्त्यावरचे लोक कायदे करू लागले तर..”; कृषी कायदे मागे घेतल्याने संतापली कंगना

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. मोदी सरकारच्या या निर्णयावर अभिनेत्री कंगना रणौत नाराज आहे. तिने यावर नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे.

“संसदेत निवडून आलेल्या सरकारच्या बदल्यात रस्त्यावरचे लोक कायदे करू लागले तर ते जिहादी राष्ट्र आहे. ज्यांना हे हवे होते त्या सर्वांचे अभिनंदन,” असे कंगनाने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “सरकार सर्व प्रयत्न करूनही शेतकऱ्यांच्या एका भागाला तीन नवीन कृषी कायद्यांचे फायदे समजावून सांगण्यात अपयशी ठरले आहे. या तीन कृषी कायद्यांचा उद्देश शेतकर्‍यांचे विशेषत: लहान शेतकर्‍यांचे सक्षमीकरण आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. तसेच तीन कृषी कायद्यांचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले, “देशाच्या कानाकोपऱ्यातील करकरी शेतकऱ्यांनी, अनेक शेतकरी संघटनांनी त्याचे स्वागत आणि समर्थन केले आहे. आज मी त्या सर्वांचा खूप आभारी आहे.”

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा