InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘राज ठाकरे हे काँग्रेससोबत गेले तर त्यांचं नुकसान’

- Advertisement -

अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरे यांना सावधान राहण्याचा सल्ला दिलाय. राज ठाकरे हे काँग्रेससोबत गेले तर त्यांच्याकडे राहिलेले मतदारही त्यांच्याकडून दुरावतील असं मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं.  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनिया गांधींच्या घेतलेल्या भेटीवर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.

मनसेने काँग्रेसच राष्ट्रवादीचा प्रचार केला, आधी अप्रत्यक्ष मतं मागितली होती, आता थेट मतं मागतील. मनसे काँग्रेस सोबत गेला तर अजून नुकसान आहे असंही त्यांनी सांगितलं. काँग्रेसची जनमानसातली प्रतिष्ठा संपली आहे. त्यांची विश्वसनियता राहिली नाही त्यामुळे मनसे काँग्रेससोबत गेली तरीही काहीही फरक पडणार नाही असंही ते म्हणाले.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.