‘स्वातंत्र्यवीर सावरकर भारताचे पंतप्रधान असते तर पाकिस्तानची निर्मिती झाली नसती’

स्वातंत्र्यवीर सावरकर देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते तर पाकिस्तानची निर्मितीच झाली नसती, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. लेखक विक्रम संपथ यांच्या ‘सावरकर इकोज फ्रॉम फर्गटन पास्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते. त्यावेळी स्वांतत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर भारताचे पंतप्रधान असते तर पाकिस्तानची निर्मिती झाली नसती. आमचं सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे, त्यामुळे मी सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करत आहे. आपल्याला रत्नाची पारख नसेल तर जागतिक पातळीवर आपली नाचक्की होते, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी केलेलं काम मी नाकारत नाही. मात्र देशात केवळ दोनच घराणी नाहीत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.