“शाहरुख खानने भाजपात प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं म्हणून सांगतील”: छगन भुजबळ

बीड : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमध्ये भाजपवर सडकून टीका केली आहे. “शाहरुख खान उद्या भाजपमध्ये गेल्यानंतर इथे कोकेन नाही तर पीठ सापडलं असं म्हणतील. तसेच सध्या संपूर्ण बॉलिवूड आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम सुरू आहे,” असं ते म्हणाले.

“मी बांधलेल्या महाराष्ट्र सदनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मिटिंग घेत होते. या घोटाळ्याप्रकरणी माझ्यावर आरोप झाले. 100 कोटीच्या घोटाळ्याचे आरोप झाले. 100 कोटीचा ठेका घेऊन 850 कोटींची लाच कोणी देईल का?,” असं छगन भुजबळांनी सांगितलं.

“मी आणि समीर अडीच वर्षे आत होतो. आमच्या घरावर 17 वेळी धाडी पडल्या. धाडी पडल्या की आमच्या पत्नी, मुले घाबरून मॉलमध्ये जाऊन बसायचे. तो काळ विचित्र होता. दिवसभर मॉलमध्ये राहायचं आणि रात्री घरी जायचे. बीड जिल्ह्यात विशेषतः परळीमध्ये जेव्हा आलो तेव्हा माझे जंगी स्वागत करण्यात आलं. या जनतेचे प्रेम पाहून मी भारावून गेलो. या प्रेमाचा उतराई कसा होऊ हे कळत नाही,” अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

तसेच, “निवडणुका जवळ आल्या की भाजपचे ओबीसी प्रेम जागे होतं. मात्र ओबीसी आरक्षणाच्या विरोधात भाजपाचेच लोक कोर्टात जातात. भाजपचे राहुल रमेश वाघ, भाजप धुळे जिल्हा सरचिटणीस हे अध्यादेशाच्या विरुद्ध कोर्टात गेले आहेत,” असं भुजबळ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा