‘शरद पवारांना पंतप्रधान व्हायचं असेल तर त्यांनी…’; सुधीर मुनगंटीवारांचा पवारांना सल्ला

मुंबई : महापालिकेतील निसटलेली सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी अजित पवार यांनी आता स्वत:च कंबर कसली आहे. निवडून येईल वा निवडून आणतील अशांना पक्षात घेण्याचा धडाका त्यांनी सुरु केला आहे. यानंतर या सगळ्या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या होत्या.
कोल्हे म्हणाले होते कि, शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागणं गरजेचं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालण्याची गरज त्यांना पडणार नाही, असं काम राष्ट्रवादीच्या नेते कार्यकर्त्यांनी करायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. यानंतर यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
मुनगंटीवार म्हणाले कि, राजकारणात इच्छा असणं गैर नाही. पण, त्या इच्छेसाठी जे कष्ट परिश्रम करावे लागतात. मोदी देशाचे पंतप्रधान झाले म्हणून आपण मोदींकडे बघून निश्चितपणे विचार केला पाहिजे. मोदी देशाचे तेव्हाच पंतप्रधान झाले, जेव्हा त्यांच्या ह्रद्यात माझा परिवार नसून देश परिवार होता, अशी टीका मुनगंटीवार यांनी पवार कुटूंबियांवर केली आहे.
तसेच पुढे शरद पवारांचा परिवार म्हणजे माझी मुलगी खासदार, माझा पुतन्या उपमुख्यमंत्री, माझा नातु आमदार असा आहे. शरद पवारांना खरंच पंतप्रधान व्हायचं असेल तर, सर्व नातेवाईकांचा आधी त्यांनी राजीनामा घ्यावा तरच, पंतप्रधान पदाचा दरवाजा उघडला जाऊ शकतो, अन्यथा शरद पवारांचं स्वप्न स्वप्नच राहील, असा सल्ला मुनगंटीवार यांनी शरद पवारांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- आर्यनला थोडा श्वास घेण्याची संधी द्या, त्याला थोडा वेळ द्या, मात्र मीडिया प्रत्येक गोष्टीवर लगेच तुटून पडते!
- “शाहरूख खानचा मुलगा असू नाहीतर इतर कोणाचाही त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे”
- मोठी बातमी : शाहरूख खानच्या अडचणी वाढल्या! आर्यनने ड्रग्जचं सेवन केलं असल्याचं दिली कबूली
- शाहरुखच्या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर सचिन वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- शाहरुखच म्हणाला होता, “माझ्या मुलानं ड्रग्ज घ्यावेत, पोरींच्या मागं जावं, सेक्स करावा”