InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘बारामतीत कोणी दादागिरी केली तर त्यांचा बंदोबस्त मी करेल’

बारामतीत कुणाची दहशत किंवा दादागिरी असू नये, असाच आम्हा सर्वांचा प्रारंभापासूनचा प्रयत्न आहे. अनेक ठिकाणी कोणी दादागिरीचा प्रयत्न करत असेल तर अशा लोकांची नावे मला सांगा. मी त्यांचा बंदोबस्त करतो, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इशारा दिला.

ते म्हणाले, ‘बारामती कायदा व सुव्यवस्था मानणारे शहर असून, येथे कोणाचीही कसलीही दादागिरी सुरू असल्याचे लोकांना समजले, तर मला तुमचे नाव न देता संबंधितांची माहिती द्या. वेळप्रसंगी अशा लोकांवर “मोका’चीही कारवाई करण्याबाबत आपण पाठपुरावा करू. तसेच आपल्याला कोणी जाबच विचारत नाही, आपले कुणी काही वाकडे करत नाही, ही भावना वाढू लागली तर ती बारामतीकरांना अडचणीची ठरणार आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने माझीही काही नैतिक जबाबदारी आहे. या शहरात महिलांसह नागरिकही निर्भयतेने फिरू शकले पाहिजेत. पोलिसांचा आदरयुक्त दबदबा असला पाहिजे, असेही पवार म्हणाले.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.