‘तो कंटेट वल्गर होता, पण…’; राज कुंद्राच्या वकीलांचं स्टेटमेंट समोर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांचा पोर्नसारख्या कुख्यात व्यवसायाशी संबंध असल्यामुळे सध्या ते चर्चेत आले आहेत. यापूर्वी, आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात त्याचे नाव येताच त्यांची बरीच बदनामी झाली होती, परंतु नंतर त्याला त्यात क्लीन चिट मिळाली. मात्र राज कुंद्रा याला सोमवारी रात्री 19 जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्यावर अश्लील चित्रपट बनवल्याचा आरोप आहे.

अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच राज कुंद्राच्या वकिलाचं स्टेटमेंट समोर आला आहे. कंटेंट वल्गर होता पण कायदेशीर भाषेत त्याला अश्लील म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद वकीलांनी केला आहे. तसेच तो कंटेट पॉर्न कॅटेगरीत येत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. मंगळवारी राजच्या वकिलांनी कोर्टात त्यांची बाजू मांडली.

राज कुंद्रा यांची अटत कायद्याला धरून नव्हती. अटक केल्याशिवाय तपास पूर्ण होऊ शकत नसेल तरच अटक करण्यात यावी. पण या प्रकरणात अटकेनंतर त्यांची चौकशी केली गेली, असंही त्यांनी म्हटलं आहे. भारतीय दंडसंहितेनुसार अश्लिल साहित्य पाठवण्यासंदर्भातील गुन्ह्यांमध्ये हा कलम लावला जातो. प्रत्यक्ष शरीरसंबंध ठेवताना साहित्य असल्यास त्याला कायदेशीर भाषेमध्ये पॉर्न म्हणतात. इतर सर्व साहित्याला अश्लील म्हणता येईल, असं वकिलांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा