InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘आघाडीबाबत जुलैअखेर निर्णय न झाल्यास स्वतंत्र लढणार’

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याची तयारी आहे.  पण याबाबत त्यांनी तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. जुलै महिन्याच्या अखेपर्यंत त्यांनी निर्णय द्यावा, अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेईल असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत पत्रकार बठकीत सांगितले.

केंद्र व राज्य सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. देशातील ६३ टक्के  लोकसंख्या अवलंबून असलेल्या शेतीसाठी बजेटमध्ये झिरो तरतूद केली आहे. हमीभावात किरकोळ वाढ केली आहे. सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे म्हणते, पण झिरो तरतूद करुन सरकारला शेतकऱ्यांचे उत्पन्नात दोन झिरो लावायचे आहेत, असेच धोरण राबविले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply