‘देवेंद्र फडणवीसांनी बनवलेला तो कायदा जर फुलप्रूफ असता तर…’; उद्धव ठाकरेंचा पलटवार

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत काही दिवस आधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या संदर्भात आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, त्यांना निवदेन सादर केले. त्यानंर पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे.

मराठा समाजाने नेहमीच समजूतदारपणा दाखवलेला आहे. मराठ्यांची लढाई ही सरकारविरोधात नाही. काय झाले ते सगळ्यांच्या समोरच आहे. त्यामुळेच आम्हाला राज्यपालांना भेटायला यायला लागलं. देवेंद्र फडणवीसांनी बनवलेला तो कायदा जर फुलप्रूफ असता तर भेटण्याचा योग यासाठी आला नसता. भाजपलाही हा निर्णय लवकरात लवकर अपेक्षित असायला काही हरकत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आम्ही लवकरच पंतप्रधानांना भेटू. महाराष्ट्राच्या विधिमंडळाने मराठा आरक्षणाचा निर्णय एकमताने घेतला होता. त्याला विरोध झाला. पण आता जो निर्णय झाला तो जनतेचा आहे. समाजाला न्याय मिळाला पाहिजे. जसं आज राज्यपालांना पत्र दिलं, तसं पंतप्रधानांची भेट घेऊन पत्र देऊ. आज राष्ट्रपतींना पत्र दिलं. आता पंतप्रधानांनी रितसर वेळ मागून भेट घेऊ आणि त्यांनाही पत्र देऊ, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा