‘राज्य सरकारने दहीहंडीला परवानगी दिली नाही तर…’; आशिष शेलारांचा सरकारला इशारा

सोलापूर : कोरोनामुळे गेले २ वर्षे झाली सर्व सण उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे. आगामी काळात दहीहंडी उत्सवाला मुंबईसहीत महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपा नेते आशिष शेलार सध्या सोलापूर दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी माध्यमंही बोलताना महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली.

तर, दुसरीकडे दहीहंडी उत्सवाच्या विषयी विचारले असता शेलार यांनी ज्या गोविंदांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्या गोविंदांना दहीहंडी साठी परवानगी द्यावी. जेणेकरून ते आपल्या विभागात पारंपारिक दहीहंडी उत्सव साजरा करू शकतील. दहीहंडी कार्यक्रमात कमी गर्दी करून ही मंडळे कार्यक्रम करतील. तसेच कमी उंचीच्या दहीहंडीला राज्य सरकारने परवानगी दिली नाही तर आंदोलन करू, असा इशारा शेलारांनी दिला आहे.

दरम्यान, दहीहंडी साजरी केल्याने जास्त मोठ्या प्रमाणावर करोनाचा प्रभाव वाढू शकतो असं टास्क फोर्सने सांगितलं असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं. हा उत्सव जागतिक स्तरावर टीकावा अशी बाजू समन्वय समितीने मांडली. गणेशोत्सवाप्रमाणे नियम आखण्याची मागणीही समितीने केली. मात्र बैठकीला उपस्थित असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवानगी का देऊ शकत नाही हे समन्वय समितीच्या सदस्यांना समजावून सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा