“यंत्रणांचा गैरवापर केला असता तर तुमचं अर्थ मंत्रिमंडळ तुरुंगात असतं”

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकताही सर्वांना लागून राहिली होता. अखेर उद्धव ठाकरे यांनी भाजपावर थेट निशाणा साधला आहे. शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात काल
पार पडला. प्रतिवर्षी शिवाजी पार्कवर होणार सोहळा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी हर हर महादेव काय असतं हे दिल्लीच्या तख्ताला दाखवावं लागणार आहे, असे देखील म्हणाले. पुत्र कर्तव्य म्हणून राजकरणात आलो आहे. अंगात धमक असेल तर अंगावर या, ईडी, सीबीआयची मदत घेऊ नका, असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. यावर आता विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी म्हटलं की, ‘केंद्र सरकार हे यंत्रणांचा गैरवापर कधीही करत नाही, जर आम्ही केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात असतं’, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा