‘वेळ आली तर सेनाभवन फोडू’; प्रसाद लाड यांचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई : आज माहीममध्ये राजा बढे चौकात भाजपच्या कार्यालयाचं प्रसाद लाड आणि नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना “वेळ आली तर सेनाभवन फोडू’, असं वादग्रस्त वक्तव्य आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे.

“नारायण राणे आणि राणे कुटुंबीयांना मानणारा देखील स्वाभिमानचा एक खूप मोठा गट आज राणे साहेबांच्या निमित्तानं, नितेशजींच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीमध्ये आलाय. त्यामुळं भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितपणे डबल झाली आहे”, असं प्रसाद लाड म्हणाले.

“नितेशजी पुढच्या वेळेस कार्यकर्ते कमी आणुयात, कारण आपण आलो की पोलिसचं खूप येतात. फक्त त्यांना सांगुयात की ड्रेसमध्ये पाठवू नका म्हणजे त्यांना हॉलमध्ये बसता येईल. एवढी तुमची आमची भीती की ह्यांना असं वाटतं हे माहिममध्ये आले की सेनाभवन फोडणार आहेत. काय घाबरू नका वेळ आली तर ते देखील करुया”, असं प्रसाद लाड यावेळी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याला शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपानं सुद्दा शाखेच्यामध्यामातून समाज सेवाचं करावी. त्यांनी कार्यालय युद्ध खेळण्यासाठी नाहीय हे समजावं. भाजपचे नेते या आधीही सेनाभवनावर भुंकले होते. शिवसैनिक कट्टर आहेत, त्यांचं कोणी वाकड करु शकत नाही, असं म्हणत सरवणकरांनी भाजपवर निशाणा साधलाय.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा