‘आज जर राजेशाही असती तर पैसे खाणाऱ्या सगळ्यांना मी हत्तीच्या पायाखाली तुडवल असतं’

सातारा : राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या भूमिकेवरुन भाजप खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. सरकारच्या लॉकडाऊन विरोधात खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (शनिवार)दुपारी पोवाईनाका येथे आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत त्यासमोरील झाडाखाली पोती टाकून बसत थाळी ठेवून भीक मागो आंदोलन केले. यावेळी उदयनराजे यांनी सचिन वाझे प्रकरणासह इतर सर्वच विषयांवर राज्यसरकारवर टीका केली. या आंदोलनामुळे साताऱ्यातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

उद्यापासून नो लॉकडाउन म्हणत ‘आज जर राजेशाही असती तर पैसे खाणाऱ्या सगळ्यांना मी हत्तीच्या पायाखाली तुडवल असतं.’ असंही यावेळी उदयनराजेंनी बोलून दाखवलं. यावेळी उदयनराजे यांनी सचीन वाझे प्रकरणासह इतर सर्वच विषयांवर राज्यसरकारवर टीका केली. या आंदोलनामुळे साताऱ्यातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

‘ज्याचं हातावर पोट आहे त्यांची लॉकडाउनमुळं काय अवस्था झाली असेल. करोनावरील लसीकरण मिळत नाही आणि ज्यांना करोना लस दिलीये ते पॉझिटिव्ह मिळत आहेत. हा काय बाजार मांडलाय का? असा सवाल त्यांनी केला आहे. तसंच, लॉकडाउन हटवून टाका असं मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो. हे सगळं धुळफेक आहे. वाझे प्रकरण लपवण्यासाठी आहे,’ असा आरोपही उदयनराजेंनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा