“वर्षभर आधीच हा निर्णय घेतला असता तर 450 शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते”

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 9 वाजता पुन्हा एकदा देशाला संबोधित केलं. यावेळी मोदींनी देशात नव्याने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यावर भाष्य केलं. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रानं विरोधकांचा विरोध डावलून संसदेत बळाच्या जोरावर संमत केलेल्या कृषी कायद्यांचा फायदा पुन्हा एकदा वाचून दाखवला.

सोबतच, हे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. या तपस्येत कमी राहिली असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. तसेच देशवासियांशी संवाद साधताना मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली. तसेच संसदेत चर्चा झाली, नंतर हे कायदे आणले. देशातील कानाकोपऱ्यातील कोट्यवधी शेतकरी, अनेक शेतकरी संघटनांचे याचे स्वागत केले. मी आज त्या सर्वांचे आभार मानतो.

यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्राच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मानवतावादी सरकार शेतकऱ्यांचा बळी जाताना उघड्या डोळ्यांनी पाहात होतं पण मोदी सरकारने वर्षभर आधीच हा निर्णय घेतला असता तर 450 शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा