‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार असतील तर आमची युतीसाठी तयारी’; शिवसेनेकडून स्पष्ट संकेत

मुंबई : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतच्या युतीबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. यानंतर राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. रावसाहेब दानवेंना शब्द देतो, तुम्ही मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी पुढाकार घ्या, आम्ही खंबीर पाठीशी राहतो” असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. मुख्यमंत्री महोदय पाठीशी उभे रहा, पुढचं मी बघतो, असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले होते.

तर मराठवाड्यात आपण आपआपसात भांडत कशाला बसायचं? नालायकपणे कारभार करुन आपणही भांडत राहिलो तर फरक काय राहिला. अपेक्षेशिवाय आयुष्य असू शकत नाही, तुम्ही आमच्याकडे आणि आम्ही तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करायच्या. एकत्र आलो तर भावी सहकारी होऊ, असे सूचक विधान करुन मुख्यमंत्र्यांनी नव्या राजकीय चर्चेला सुरूवात केली आहे.

यानंतर आता शिवसेनेचे नेते आणि महसूलमंत्री अब्दुल सत्तार यांनी सेना-भाजप युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे पुढील तीन वर्षे मुख्यमंत्री राहणार असतील तर आमची युतीसाठी तयारी आहे, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली होती. त्यावेळी अब्दुल सत्तार यांनी हे वक्तव्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा