InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

युद्ध झालंच तर त्याला भारतच जबाबदार असेल – इम्रान खान

- Advertisement -

कलम 370 काढून टाकण्याच्या निर्णयाने पाकिस्तानात चांगलीच खळबळ उडालीय. भारताला वारंवार युद्धाच्या धमक्या देण्याचं त्यांनी सुरूच ठेवलंय. 14 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी पाकव्याप्त काश्मीरमधल्या मुजफ्फराबाद इथं जाऊन भाषण केलं. काश्मीरमधली परिस्थिती बिघडली आहे. या प्रश्नावरून युद्ध झालंच तर त्याला भारतच जबाबदार असेल असं मत त्यांनी व्यक्त केलं.

इम्रान खान म्हणाले, भाजपचे लोक मानसिक रुग्ण आहेत. त्यांना हिंदुत्वाचा विचार थोपवायचा आहे. RSSचं भूत बाटलीतून आता बाहेर आलंय. पूर्वीचा सहिष्णू भारत आता राहिलेला नाही. ही परिस्थिती कुठलंही रुप घेऊ शकते. याचे भारताला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला.

Loading...

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.