InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

शेतकऱ्यांना नडाल तर तुमची मुंबईतील दुकाने बंद करू- उद्धव ठाकरे

- Advertisement -

शेतकऱ्यांना नडाल तर तुमची मुंबईतील दुकाने बंद करू . लवकरात लवकर ही विमा प्रकरणं निकाली काढा. या विमा कंपन्यांना सरकारी भाषा समजत नसेल तर शिवसेनेच्या भाषेत समजवू, असे ठणकावतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्यांना ताळ्यावर आणण्यासाठी शिवसेना 17 जुलै रोजी वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘भारती ऍक्सा’ या विमा कंपनीवर धडक मोर्चा काढेल, असा इशारा आज दिला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन पीक विमा कंपनीवरील इशारा मोर्चाविषयी माहिती दिली. उद्धव ठाकरे म्हणाले, नेहमी शेतकरी मोर्चा घेऊन मुंबईत येतात. त्यांना व्यथा मांडण्यासाठी

- Advertisement -

इथे यावे लागते हे बरोबर नाही. त्यामुळे हा  शेतकऱ्यांचा मोर्चा नसेल तर हा शेतकऱ्यांसाठीचा मोर्चा असेल. त्या अन्नदात्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी मुंबईत शिवसेनेने हा विषय हाती घेतला आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कळावे की आपण पोरके नाहीत. सरकार आपल्या पाठीशी आहेच, पण शिवसेना आपल्यासोबत राहील.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.