“हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं, भाजपासहित सर्वांची यादी देतो”, उदयनराजे संतापले

मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात अनेक गौप्यस्फोट होत आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांविरोधात ईडीची कारवाई सुरु आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची चौकशी सध्या ईडी, आयकर विभाग किंवा सीबीआय करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपाकडून राजकारणासाठी वापर होत असल्याची तक्रार विरोधकांकडून केली जात

मात्र आता भाजपाकडून हा आरोप फेटाळून लावण्यात येत आहे. भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी आता यावर भाष्य केलंय. राज्यात गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीची चौकशी सुरू आहे. जसं आपण पेरतो, तसं उगवत आहे. त्यामुळे आमच्या मागे ईडी लागलेली नाही. ज्यांनी वाईट केलं आहे, त्यांच्या मागे ती लागलेली आहे. असं ते म्हणाले.

तसेच पुढे हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं. ईडीच्या कारवाईमागे भाजपाचं षडयंत्र असल्याच्या आरोपाविषयी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “कोणीही असू दे मी सर्वांची यादी देतो. एकमेकांच झाकायचं आणि सोयीप्रमाणे एकमेकांचं काढतात. बास झालं आता राजकारण”. असंही उदयनराजे यांनी यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा