“हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा”

नंदुरबार : शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. त्यांनी आजही चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका केली. ‘शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे.’ असे पाटील म्हणाले. याचा पलटवार करत ‘हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा.’ असे आव्हान राऊतांनी भाजपला दिला.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची खिल्ली उडवली. “चंद्रकांत पाटलांचा काल वाढदिवस होता. त्यांनी जास्तच केक खाल्ला असेल. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेऊ नका. शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे, असे चंद्रकांतदादा म्हणत आहे. त्यांना तसे वाटत असेल तर मी त्यांना पिंजऱ्यात येण्याचे आमंत्रण देतो. हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा.” असे आव्हानच राऊतांनी भाजपला दिला आहे.

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीवरही राऊतांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. “प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. एखादा सर्व्हे करण्यासाठी किंवा एखाद्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ते पवारांना भेटले असतील. त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही.” असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा