“तुम्ही गाणं म्हटलं की कलाकार आणि लोककलावंतानी नृत्य केलं तर ते नाचे”

मुंबई : लावणी सम्राज्ञी आपल्या लावलीने रसिकांना साद घालणाऱ्या सुरेखा पुणेकर यांनी १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. सुरेखा पुणेकर यांच्या पक्ष प्रवेशावरुन विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टोला लगावला होता. “राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे,” असा टोला प्रवीण दरेकरांनी यावेळी लगावला होता.

“या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे,” अशी टीकाही यावेळी दरेकरांनी केली होती. यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दरेकरांच्या टीकेला प्रत्युत्तर दिल होत. तुमच्या बोलण्यावरुन तुमची आणि तुमच्या पक्षाची संस्कृती दिसून आली. प्रविण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं आहे त्यामुळे तुुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला पक्ष गाल आणि थोबाड रंगवून दाखवेल, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं होत.

यानंतर आज आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातील आयोजित एका कार्यक्रमात रूपाली चाकणकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी एखादं गाणं म्हटलं नृत्य केलं तर ती कला आणि लोककलावंतानी असं केलं तर ते नाचे, असले खालच्या पातळीचे विचार भाजपचे आहेत, अशा शब्दात चाकणकर यांनी अमृत फडणवीसांवर निशाणा साधला आहे. महिलांना दुय्यम वागणूक देणं ही भाजपची संस्कृती असल्याची टीका यावेळी चाकणकर यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा