‘आंदोलन करायचं असेल तर कोरोना विरोधात करा’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन परिषदचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजप आणि मनसेला चांगलेच फटकारलं आहे.

“कोरोनाच्या महामारीत आपण खूप काळजी घेत आहोत. परंतु, इतरांना अनेक गोष्टी सुरू करण्याची घाई झाली आहे. आपण ज्या गोष्टी सुरू केल्या आहेत. त्या पुन्हा बंद करण्याची आपल्यावर वेळ येऊ नयेत. अशा वेळी आपण घाई केली केली तर आणखी खूप वर्ष, महिने संकटातून बाहेर पडू शकणार नाहीत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“मी राजकारणातील सगळ्या लोकांना सांगतो की, राजकारण आपल्या सर्वांच होतं. परंतु, जीव सामान्य लोकांचा जातो. जनतेच्या जीवाशी खेळू नका. आंदोलन करायचे असेल तर कोरोना विरोधात करा,” असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा