“तुम्हाला जर फाटकी जीन्स घालायची असेल तर कूल दिसा भिकाऱ्यासारखं नाही”

मुंबई : उत्तराखंडचे भाजपचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या कपड्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे अनेक लोकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलं की, एक महिला आपल्या दोन मुलांना जवळच घेऊन बसलेली होती.

त्या महिलेनं फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलं तुम्ही कुठे जात आहात? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला. मी पुढे चौकशी केली तर त्या महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते. माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल, असं तीरथ सिंह रावत म्हणाले होते.

यानंतर अशातच सध्या फाटक्या जीन्सवरून चालू असलेल्या वादात कंगणाने उडी घेतली आहे. कंगणानेही जीन्स फाटक्या घालाव्यात पण कशा प्रकारच्या घालाव्यात यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.जर तुम्हाला फाटलेली जीन्स परिधान करायची असेल तर ती तुम्हाला या फोटोमध्ये जसे दिसत आहेत त्याप्रमाणे तुम्ही कूल दिसायला पाहिजे, भिकारी असल्यासारखे नाही, असं कंगणाने म्हटलं आहे. यासंदर्भात तिने ट्विट केलं आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी फाटक्या जीन्सवरून महिलांवर निशाणा साधला होता.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.