Immunity Booster | स्वयंपाकघरातील ‘हे’ मसाले वाढवू शकतात इम्युनिटी पॉवर, आजच करा आहारात समावेश
Immunity Booster | टीम महाराष्ट्र देशा: कोरोना व्हायरस (Corona virus) ने पुन्हा थैमान घातले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ व्हायला लागली होती. अशा परिस्थितीमध्ये इम्युनिटी (Immunity) पॉवर मजबूत ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण कोरोनासह बदलत्या वातावरणापासून आपल्याला आरोग्याचे संरक्षण करायचे आहे. कारण या बदलत्या वातावरणामुळे मोसमी आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे आपण आपली प्रतिकारशक्ती मजबूत ठेवली पाहिजे. इम्युनिटी पॉवर मजबूत ठेवण्यासाठी स्वयंपाकघरात उपलब्ध असलेले मसाले मदत करू शकतात. होय! स्वयंपाकघरात उपलब्ध असलेले काही मसाले प्रतिकारशक्ती वाढवू शकतात. स्वयंपाकघरात उपलब्ध असलेले पुढील मसाले इम्युनिटी पॉवर वाढवू शकतात.
लवंग
लवंग आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. कारण यामध्ये अँटीअँक्सीडेंट, अँटी इम्प्लिमेंटरी आणि अँटिस्पेक्टिक गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे बदलत्या वातावरणामध्ये दररोज लवंगाचा वापर केल्याने, तुम्ही अनेक आजारांपासून सुरक्षित राहू शकतात. त्याचबरोबर नियमित खाद्यपदार्थांमध्ये लवंग वापरल्याने तुमची इम्युनिटी पॉवर मजबूत होऊ शकते.
हळद
हळदीमध्ये माफक प्रमाणामध्ये अँटीबॅक्टरियल, अँटिऑक्सिडेंट आणि अँटी इम्प्लिमेंटरी गुणधर्म उपलब्ध असतात. म्हणून अनेक आजारांवर उपाय म्हणून हळदीचा उपयोग केला जातो. हळदीचा दररोज वापर केल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होते. गरम दुधासोबत किंवा पाण्यासोबत हळदीचे सेवन केल्याने आरोग्य चांगले राहू शकते.
जायफळ
आयुर्वेदामध्ये जायफळाला खूप महत्त्व आहे. कारण जायफळामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. यामध्ये कॉपर, मॅग्नेशियम, फायबर आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. त्यामुळे नियमित जायफळाच्या सेवनाने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | 24, 25 आणि 31 डिसेंबरला पहाटे 5 पर्यंत सुरु राहणार बार, संजय राऊतांचा आशिष शेलारांना सवाल
- IPL Auction 2023 | बस ड्रायव्हरचा मुलगा खेळणार IPL , ‘या’ संघामध्ये झाला सामील
- Sanjay Raut | भ्रष्ट सरकारविरोधात अण्णा हजारे काहीच बोलत नाहीत – संजय राऊत
- Panda Mini EV | टाटा नॅनोपेक्षा छोटी कार लाँच, देईल ‘या’ गाडीला टक्कर
- Weight Loss Tips | पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय
Comments are closed.