बजेट २०२० : यंदाच्या अर्थमंत्र्यांकडून रेल्वेसाठी झाल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा !

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रात २०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठी बजेट सादर केले. यामध्ये त्यांनी करदात्यांसाठी नवीन टॅक्स स्लॅब सादर केले . तर शेतकऱ्यांसाठी देखील नवनवीन योजना आणि सुविधा सुरु केल्या आहेत.

कोरोना व्हायरसचा भारतात शिरकाव ; अशी घ्या स्वतःची काळजी !

या बरोबरच रेल्वे प्रशासनाने सुद्धा या बजेटने आज विशेष असे काही दिले नाही . मात्र यांच्यासाठी देखील काही नवीन धोरणे अर्थमंत्रांकडून सादर करण्यात आली आहेत.यापुढे देशात तेजस सारख्या ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत.आणि या ट्रेन्स प्रयत्न स्थळांना जोडण्यासाठी वापरण्यात येणार आहेत.तसेच १५० खासगी ट्रेन्स देखील चालू करण्यात येणार आहे. आणि ५५० स्टेशन्सवर वायफायची सुविधा देणार आहेत.

हार्दिक पंड्यासोबत नितीन गडकरी आणि फडणवीस यांची क्रिकेटबाजी !

तसेच संपूर्ण देशतील मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बंद केले जाणार आहेत आणि २७ हजार किमी रेल्वे लाइनचे विद्युतीकरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली. रेल्वे रुळांलगत सौरऊर्जा ग्रीड बसवण्याची योजना आणण्याची तयारी चालू आहे. तसेच आता मुंबई-अहमदाबाद मार्गावर हायस्पीड  ट्रेन सुरु करण्यात येणार आहे.महत्वाची बाब म्हणजे 148 किमी बंगळुरु उपनगरीय ट्रेन सिस्टम तयार करणार असून यासाठी लागणारी १५ टक्के निधी केंद्र सरकार देणार आहे.

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा