InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी

राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे.सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडून याचिकेवर सुनावणी होणार आहे. या खंडपीठात न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, डी. वाय. चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस. अब्दुल नजीर यांचा समावेश आहे. न्यायालयानं नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या कामाच्या गतीबद्दल नाराजी व्यक्त करणारे विशारद अयोध्या प्रकरणातील मुख्य याचिकाकर्त्यांपैकी एक आहेत. समितीकडून सुरू असलेले मध्यस्तीचे प्रयत्न थांबवून जलद गतीनं सुनावणी घ्यायची का, यावर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय घेण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणात मध्यस्ती करण्यासाठी ८ मार्चला त्रिसदस्यीय मदतीची स्थापना केली. माजी न्यायमूर्ती एफ. एम. कलीफुल्ला या समितीचे अध्यक्ष असून आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर आणि वरिष्ठ अधिवक्ते श्रीराम पंचू सदस्य आहेत. १५ ऑगस्टपर्यंत सर्वमान्य तोडगा काढण्याच्या सूचना समितीला न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply