शरद पवार यांच्या अध्यक्षेतेखाली राष्ट्रवादीची महत्वपूर्ण बैठक; विधानसभेबाबत चर्चा

मुंबई येथे आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात ची अत्यंत महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते  आणि सर्वेसर्वा यांच्या अध्यक्षतेखाली झाली संप्पन झाली.

या बैठकीत औरंगाबामधील राजकीय परिस्थितीवर सखोल चर्चा करण्यात आली. आज झालेल्या  बैठकीत लोकसभा निवडणुकीत पक्षाला आलेल्या अपयशाची कारणे व आगामी निवडणुकीची रणनीती यावर देखील चर्चा करण्यात आली.

सामाजिक न्यायविभागाचे सचिव मिलिंद जानराव यांनी राखीव विधानसभा मतदारसंघातून लढवण्याची इच्छा व्यक्त केली. जानराव हे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार दिलीप सोपल यांचे विश्वासू आणि अत्यंत निकटवर्तीय मानले जातात.

दरम्यान या बैठकीस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.आमदार जयदेव गायकवाड, मिलिंद जानराव, पंडित कांबळे, राजेंद्र नवगिरे आणि अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.