महत्वाची बातमी : मुंबईत विनामास्क फिरल्यास होणार ‘इतक्या’ रुपयांचा दंड!

मुंबईत मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जर कोणी मुंबईत विनामास्क फिरल्यास आढळले तर त्याच्याकडून 1 हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

राजकीय पक्षांना सर्वाधिक देणग्या कॉर्पोरेट क्षेत्राकडून

जो कोणी मुंबईत विनामास्क फिरताना आढळल्यास त्याच्याकडून 1 हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल, असे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहेत. जो कोणी या आदेशाचे उल्लघंन करेल त्याच्यावर कलम 188 अंतर्गत कारवाई करण्यात येईल.

कोणत्याही कारणासाठी रस्ते, कार्यालये, दुकाने, बाजार, दवाखाने, रुग्णालये यासारख्या सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येक नागरिकाने मास्क लावणं बंधनकारक आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईत दरदिवशी जवळपास एक हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात येत आहे.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.