महत्वाची बातमी : दहावीचा निकाला ‘या’ पद्धतीने जाहीर करणार

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द झाली. त्यानंतर मात्र दहावीचा निकाल कशापद्धतीने जाहीर होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागून होतं. यावर आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकालासंदर्भातील कार्यपद्धती जाहीर केली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल करण्यासंदर्भातील कार्यपद्धती जाहीर केली. त्यानुसार या निकालाबाबतचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.

दहावीचा निकाला संदर्भातील कार्यपद्धतीमध्ये नववीचा अंतिम निकाल ग्राह्य धरला जाणार आहे. त्यात 100 गुणांचे 50 गुण तयार करण्यात येणार आहेत. तर  दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्याक्षिक, अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात येणार आहे. त्यानुसार इयत्ता नववीतील 100 पैकी 50 गुण तर दहावीतील 80 पैकी 30 गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

दहावीचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल, अशी चर्चा सध्या सुरु आहे. मंडळाकडून निकाल वेळेवर जाहीर करण्याकरिता सर्व शाळांनी वेळापत्रकाचे कसोशीने पालन करावं, अशा सुचना वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.

शिक्षण मंडळाकडून मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्याचा तपशील, सूचना आणि वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. 10 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता शिक्षक आणि मुख्याध्यापकांना या कार्यपद्धतीच्या संदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे. यंदा सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने होणार असल्यानं आता यावेळी लवकर निकाल लागण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा