महत्वाची बातमी : रिया चक्रवर्तीच्या न्यायलयीन कोठडीत 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ !

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पुरत्या अडकलेल्या रिया चक्रवर्तीच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सुशांत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर तुरुंगात असलेल्या रिया चक्रवर्तीच्या न्यायलयीन कोठडीत 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान रिया आणि शौविक यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने दोघांचाही जामीन अर्ज फेटाळला. या आधीही न्यायालयाने दोन वेळा रियाचा जामीन अर्ज फेटाळला होता.

रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडी मंगळवारी (22 सप्टेंबर) संपणार होती. 8 सप्टेंबर रोजी रियाला अटक करून तिची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आली होती. पोलीस कोठडीऐवजी रियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली होती.

रियाने ड्रग्ज देवाण-घेवाणीत आपला सहभाग असल्याचे मान्य केल्यावर एनसीबीकडून तिला अटक करण्यात आली होती. रिया चक्रवर्ती या प्रकरणात दोषी आढळल्यास तिला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.