कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची उद्धव ठाकरेंना महत्त्वाची सूचना

मुंबई : देशात आयसीएमआर आणि निती आयोग यांनी येणाऱ्या काळात तिसरी लाट येणार असल्याचं सांगितलं आहे. येणाऱ्या काळात गणेशउत्सव आणि दहीहंडी सारखे उत्सव आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सूचना दिल्या आहेत.

कोरोना संक्रमण संदर्भातील सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला दिल्या आहेत. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून आगामी काळात निर्बंध लावले पाहिजेत, अशा सूचना केल्या आहेत. आपले सण उत्सव कोरोनाचे नियम पाळून साजरे केले नाहीत, तर सण उत्सवच सुपर स्प्रेडर ठरतील’, असं भाकित आयसीएमआरने वर्तवलं आहे. या पत्रामध्ये टेस्ट- ट्रॅक- ट्रीट या त्रिसूत्रीवर भर द्यायला हवा, असं म्हटलं आहे.

यापूर्वी राज्य सरकारने ‘सण, उत्सव काळजी घेऊनच साजरे करायला हवेत. आज आपण जनतेच्या जीवाचं जास्त रक्षण करायला पाहिजे. आपण सर्वांनी कोरोना नियम पाळून जबाबदार नागरिक आहोत, हे देशाला दाखवून द्यायला हवं,’ असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा