Imtiaz Jaleel | समृद्धी महामार्गावर अपघात नाही तर प्रवाशांची हत्या झाली – इम्तियाज जलील

Imtiaz Jaleel | छत्रपती संभाजीनगर: नागपूरवरून पुण्याला जाणाऱ्या एका खाजगी बसचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. अपघातामध्ये 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत.

The government has inaugurated Samriddhi Highway for political interest – Imtiaz Jaleel

बुलढाणामध्ये झालेल्या भीषण अपघातावरून इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. इम्तियाज जलील म्हणाले, “राजकीय स्वार्थासाठी सरकारनं समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाटक करून या महामार्गाचं उद्घाटन केलं होतं. हा उद्घाटन सोहळा एक मीडिया इव्हेंट होता. घाईघाईने उद्घाटन केल्यामुळे दररोज या समृद्धी महामार्गावर अपघात होत आहे. आज या महामार्गावर 25 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.”

पुढे बोलताना ते (Imtiaz Jaleel) म्हणाले, “मी याला अपघात नाही तर प्रवाशांची हत्या, असं म्हणेल. या हत्येला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार आहे. ते फक्त सहानुभूती आणि मीडिया इव्हेंट करण्यासाठी येणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये माणसाची किंमत पाच लाख रुपये झाली आहे.”

दरम्यान, सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा गावाजवळ हा भीषण अपघात झाला (Imtiaz Jaleel) आहे. या ठिकाणी ही बस पलटी झाली आणि बसला अचानक आग लागली. या अपघातामध्ये बस जळून खाक झालेली असून 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3XBdN2E

You might also like

Comments are closed.