“काही दिवसांत मोदी टीव्हीवर येऊन रडतील”; खासदाराची भविष्यवाणी ठरली खरी!

राज्यसभेचे आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी शुक्रवारी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याचा दावा केला आहे. सिंग यांनी मागील महिन्यामध्येच पंतप्रधान मोदी देशातील कोरोना परिस्थितीसंदर्भात बोलताना टीव्हीवर येऊन रडतील आणि सगळ्या वृत्तवाहिन्या त्यांच्याच बातम्या दाखवतील, असं म्हटलं होतं.

आम आदमी पार्टीने जारी केलेल्या अधिकृत पत्रकामध्ये संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल व्यक्त केलेली शक्यता खरी ठरली आहे. राज्यसभेतील ‘आप’चे खासदार असणाऱ्या संजय यांनी १७ एप्रिलच्या एका मुलाखतीमध्ये व्यक्त केलेलं भाकित २१ मे रोजी खरं ठरलं, असं ‘आप’ने म्हटलं आहे.

१७ एप्रिल रोजी दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय यांनी, “अजून थोडा दिवस वाट पाहा. पंतप्रधान मोदी तुमच्यासमोर येतील. ते फक्त त्यांच्या लाईट्स आणि कॅमेरासाठी वाट पाहत आहेत. ते टीव्हीवर रडतील आणि देशभरातील वृत्तवाहिन्या पंतप्रधान कशापद्धतीने भावूक झाले आणि रडू लागले यासंदर्भातील बातम्या चालवतील,” असं म्हटलं होतं.

याच मुलाखतीमधील काही भाग शेअर करत संजय यांनी मोदींवर शुक्रवारी ट्विटरवरुन निशाणा साधला. “जे १७ एप्रिलला बोललो होतो ते २१ मे ला खरं ठरलं. देशाला एक संवेदनशील आणि चांगल्या मनाचा व्यक्ती हवाय. ढोंग करणारे पंतप्रधान देशाला नकोयत ज्यांनी स्वत: निवडणुकीदरम्यान प्रचारसभा घेऊन करोनाचा प्रसार केला आणि आता रडण्याचं नाटक करत आहेत,” असा टोला संजय यांनी लगवाला आहे.

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी मोदींचा कंठ दाटून आल्याचं पहायला मिळालं.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा