पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनी मानले कोरोनायोद्ध्यांचे आभार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाविरोधात पहिल्या फळीत लढत असेलल्या कोरोनायोद्ध्यांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले. शस्त्राने नाही तर आपल्याला सेवेने हे युद्ध जिंकायचं आहे, असं आवाहन त्यांना केलं.

पुण्यात भाजप उमेदवार गिरीश बापट यांची वरचढ

‘आपल्या सर्वांना वैयक्तिक स्वरूपात पत्र लिहित असताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझी छाती अभिमानाने फुलून गेली आहे. हीच आपल्या महाराष्ट्र आणि मराठी मातीची परंपरा आहे. संकटकाळात महाराष्ट्र मागे हटत नाही. आज आपण सगळेच कोरोनाशी लढत आहेत, युद्ध करत आहोत. हे युद्ध सोपे नाही. या युद्धात कोविड योद्धा म्हणून आपण मैदानात उतरला आहात.’

जनावरांना चारा म्हणून चक्क स्ट्रॉबेरी देण्याची आली शेतकऱ्यांवर वेळ

‘माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण महाराष्ट्राच्या रक्षणासाठी सज्ज झालात. कोरोनाची साथ ओसरल्यावर तुम्ही या विजयाचे खरे शिल्पकार असणार आहात यात काही शंका नाही,’अशी भावना मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा