अहमदनगरमध्ये 42 जणांना कोरोनाची बाधा

अहमदनगर : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे . राज्यात आतापर्यंत 9318 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आली. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य प्रशासन आपापल्यापरीने सर्वतोपरी मेहनत करताना दिसून येत आहेत.

अहमदनगरमध्ये आतापर्यंत तब्बल 42 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 16 जण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. अहमदनगर मध्ये आतापर्यंत कोरोनामुळे  2 जणांचा बळी गेला आहे. अहमदनगर प्रशासन या बाबतीत सतर्क झाले असून नागरिकांना घरातच राहण्याचे व घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासन वारंवार करत आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.