अयोध्येत शिवसेना योगी आदित्यनाथांविरोधात देणार उमेदवार; संजय राऊतांची घोषणा

मुंबई : उत्तर प्रदेशची निवडणूक देशाची दिशा ठरवते असं म्हटलं जातं. त्यामुळेच आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. एकीकडे मागील निवडणुकीत कसल्याही अडचणीशिवाय मताधिक्याने सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला या निवडणुकीपूर्वीच धक्क्यांवर धक्के बसत आहेत. गेल्या एका महिन्यापासून अनेक आमदारांनी तसेच मंत्र्यांनीही भाजपला रामराम ठोकला आहे.

या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. यूपीचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. सध्या यूपीमध्ये भाजपकडून तिकीट वाटपाची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यातच आता शिवसेनेने देखील दंड थोपटले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना अयोध्येत योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात उमेदवार देणार आहे अशी घोषणा केलीय.

याशिवाय शिवसेना उत्तर प्रदेशमधील प्रचाराची सुरुवात मथुरेतून करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. माझ्याकडे मथुरेतील काही प्रमुख लोक येऊन गेले. त्यांनी शिवसेनेच्या प्रचाराची सुरुवात मथुरेतून करावी अशी आग्रही मागणी केलीय. अयोध्येप्रमाणे मथुरेत देखील काही प्रश्न आहेत. पुढील २-३ दिवसात मी स्वतः मथुरेत जाणार आहे. तिथे कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा