ऐकावं ते नवलंच, महामारीला पळवायचंय म्हणून थेट कोरोना देवीची स्थापना

सोलापूर : देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोनामुळे असंख्य लोकांचा बळी गेला. एवढच नाही तर जगात महिने च्या महिने यामुळे लॉक डाऊन ठेवले होते कि कोरोनाचा प्रदुर्भाव एकमेकांना एकमेकांच्या संदर्भात राहिल्याने होऊ नये, पण देशातील काही लोकांना या सर्व गोष्टी विनाकारण केल्याचे वाटत आहेत. आता पहा ना सोलापुरातील हि एक घटना आहे. जेथे कोरोना ला कोरोनादेवी बनविले, आणि कोरोनादेवीच्या नावावर कोंबड्यांचा आणि बोकडांचा बळी द्यायला सुरुवात केली होती.

पण कोंबड्यांचा आणि बोकडांचा बळी देणे कितपत योग्य वाटत? याला सरळ सरळ मूर्खपणा म्हणाव लागेल. कोरोनाचा प्रादुर्भाव किंवा त्याची लागण होऊ नये या साठी चक्क कोरोना देवीची स्थापना करण्यात आली. हा मूर्खपणाचा प्रकार सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी शहरातील पारधी वस्तीत पाहायला मिळाला.

काही दिवसा अगोदर एक विडीओ वायरल झाला होता ज्या विडीओ मध्ये एक महिला असे वक्तव्य करताना दिसली कि, “कोरोना काळात आम्ही मास्क वापरला नाही, फक्त कोरोना देवीची पूजा करत असल्यामुळे आम्हाला सर्दी खोखला असे काहीही झाले नाही”

सोलापुर जिल्ह्यातील बार्शी शहराच्या एका पारधी वस्ती मध्ये तीन जणांनी कोरोना नावाच्या देवीची स्थापना करून तिला प्रसन्न करण्यासाठी कोंबड्या आणि बोकड यांचा बळी देण्याची धक्कादायक घटना समोर आल्याने त्या भागाचे पोलीस निरीक्षक एस. डी. गिरीगोसावी यांनी या माहितीची दखल घेत तीन जणांवर गुन्हा दाखल केला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा