InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

नियम मोडल्यास एसटीचालकांच्या पगारातून दंडाची वसुली

एसटीचालकांकडून वाहतुकीचे नियम मोडल्याने वाहतूक पोलिसांनी ई-चलानद्वारे दंड आकारला आहे. त्याची वसुली संबंधित चालकांच्या पगारातून करण्याचे आदेश एसटीच्या विभाग नियंत्रकांनी दिला आहे. मात्र या वसुलीचा राष्ट्रीय मजदूर कॉंग्रेसचे (इंटक) अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी निषेध केला आहे.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास वाहनचालकांना ई-चलानद्वारे दंड आकारला जातो. त्यासाठी रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. तसेच वाहतूक पोलिसांना अत्याधुनिक यंत्रेदेखील देण्यात आली आहेत. त्यानुसार वाहनचालकांवर कारवाई केली जाते. अशाच प्रकारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एसटीचालकांवरसुद्धा पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये परळ आगारातील 10, उरण आगारातील पाच बसचा समावेश आहे.

दंडाची रक्कम कामगारांच्या पगारातून कापणे म्हणजे हुकूमशाही आहे. आधीच कामगारांना पगार कमी, त्यात अशी वसुली अन्यायकारक आहे. प्रत्येक वेळी ई-चलान दिल्याने पगारातून दंडवसुली झाली तर कामगारांनी खायचे काय, असा अन्याय अजिबात सहन होणार नाही.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply