खर तर शेतकऱ्यांना हेच माहिती नाही कि नेमका कृषी कायदा काय ?

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या ३ कृषी कायदे रद्द करण्यासाठी गेले अनेक दिवस शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. कृषी कायद्यावर लवकरात लवकर मोदी सरकारने कृषी कायद्याबाबत निर्णय द्यावा असे सुप्रीम कोर्टाने खडसावले होते. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांवरआणि शेतकरी आंदोलनावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासमोर याप्रकरणी सुरु होत आहे. सर्वोच्च न्यायालयानं कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे.

मात्र यानंतर आता कृषी कायद्यावरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केली आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडून या आदोलनावर टीका केली जात आहे. अशातच आता भाजपाच्या खासदार आणि अभिनेत्री  हेमा मालिनी यांनी आता शेतकरी आंदोलन प्रश्न चिन्ह उभे केले आहे.

एएनआय या वृत्त संस्थेशी बोलतांना हेमा मालिनी म्हणाल्या,’खर तर शेतकऱ्यांना हेच माहिती नाही कि नेमका कृषी कायदा काय ? या कायद्याबाबत त्यांना संपूर्ण माहिती नसल्यामुळे असं समजते की ते कोणाच्यातरी सांगण्यावरून आंदोलनासाठी बसले आहेत हे स्पष्ट होतं.” असं म्हणत त्यांनी शेतकरी आंदोलनावर सवाल उपस्थित केले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.